Supriya Sule | “शाहरुख खान भारताचा…”; ‘पठान’ चित्रपटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule | मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या ‘पठान’ चित्रपटावरुन देशात मोठा राजकीय वाद उफाळला. या चित्रपटाची जगभरात चर्चा झाल्याचे पाहायला मिळते. अनेक वाद आणि टीकांनंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली असून जगभरात आतापर्यंत ‘पठाण’ने 300 कोटी रुपये कमावले आहेत. दीपिकाची ‘बेशरम रंग’ गाण्यामधील भगवी बिकिनी तर वादाचा विषय ठरली. सध्या ‘पठान’चं सर्वत्र कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.

“शाहरुख खान भारताचा सुपरस्टार आहे. तो त्या चित्रपटात (पठाण) अगदी चांगला दिसत आहे. तो व दीपिका एकत्र अगदी छान दिसत आहेत. मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. ‘Unfiltered By Samdish’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ‘पठान’ चित्रपट तसेच शाहरुख खान आणि दीपिकाबाबत भाष्य केले आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘पठान’ या सिनेमाला विरोध केला आहे. त्यांचे तुम्ही समर्थन करता का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजिबात नाही. मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी अशावेळी त्या व्यक्तींना फोन करेन. त्यांना विचारेन की, भाऊ तुला काय झालं आहे?”, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या