Sanjay Raut | “श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई : राज्यात एकीकडे राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

संजय राऊतांचा गंभीर आरोप

खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्या हत्येची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

“अशा परिस्थितीत माझ्या जीवितास धोका”- Sanjay Raut

“महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात नवं सरकार आलं. या सत्तांतरानंतर माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे. अशा स्थितीत माझ्या जीवितास धोका आहे”,अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद चिघळला असताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी दुसऱ्यांदा अशा आशयाचं पत्र लिहिलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांनी यासंदर्भातील एक पत्र लिहिलं आहे.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

“गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. मात्र, मला एक गंभीर बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीला माझी हत्या करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण बघता हा विषय आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे”, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

“श्रीकांत शिंदेंनी गुंड राजा ठाकूरला सुपारी दिली”

“श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला या हल्ल्याची सुपारी दिली आहे”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात माझ्याकडे पक्की माहिती असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पत्रात नमूद केलेली गंभीर बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव यात घेण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Exit mobile version