Chhagan Bhujbal शिवीगाळीवर संजय गायकवाड म्हणाले, मला जी भाषा येते ती मी…

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Reply On Statement Of Abuse Against Minister Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal VS Sanjay Gaikwad |  छगन भुजबळ यांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा, भुजबळ त्या मंत्रीपदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत असं आवाहन संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले होते. भुजबळ यांच्या मनात जातीयवाद असेल तर ते मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत, असेही संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) म्हणाले होते.

तर संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले, ”मला कधीही मंत्रिमंडळातून बाहेर काढू शकतात. मला त्यात दु:ख नाही. मला मंत्रिमंडळाबाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना आहे. तर संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा ही चुकीची असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेवर संजय गायकवाड यांनी पुन्हा पलटवार केला आहे. जी मला भाषा येते, तिच भाषा मी वापरली, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे.

Sanjay Gaikwad Abused Chhagan Bhujbal; UNCUT Viral Audio Clip

Note – This Audio Clip Is Not Endorsed By ‘Maharashtra Desha’.

Maratha MLA Sanjay Gaikwad Abuse Chhagan Bhujbal

मराठा आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) म्हणाले की, मला भुजबळांना सांगायचे की, ज्या ५७ लाख मराठा नोंदी ओबीसीत असल्याच्या सापडलेल्या आहेत. त्यामुळे कुणाचा बापही आता मराठ्यांच्या मुलांना आरक्षणापासुन रोखु शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे.

गेल्या ७० वर्षापासुन मराठे वंचित राहीलेले आहेत. म्हणुन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) सरकारमध्ये राहुन माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करुन जर मराठा समाजाबद्दल ( Maratha Reservation ) विरोधात भुमिका घेत असतील तर त्यांना लाथ घालुन बाहेर काढायला हवे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.