Prithviraj Chavan | “अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ…”; अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prithviraj Chavan | सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून येणारे आमदार यावर भाष्य केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “अजित दादांच्या स्टेटमेंटला काही विशेष अर्थ नाही. भाजपला कोण पराभूत करेल हे सध्या जास्त महत्त्वाचं आहे. पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता उत्साहवर्धक स्टेटमेंट देत असतो. त्यामध्ये काही गैर नाही. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा आहे. काँग्रेस दोन नंबरचा तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना तीन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे हे विधान करण्यामागं अजित दादांचं काही चुकलं नाही.”

पुढे बोलताना ते (Prithviraj Chavan) म्हणाले, “आत्तापर्यंत जे जे निकाल आले आहे, त्याचा सारासार विचार करूनच जागा वाटपाचा निर्णय होणार आहे. भाजपला कोणता पक्ष पराभूत करेल, यावर चर्चा होणे या घडीला सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे दादांच्या या स्टेटमेंटचा फार काही विशेष अर्थ नाही.”

अजित पवार नक्की काय म्हणाले होते? (What exactly did Ajit Pawar say?)

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आपल्याला मिळून महाविकास आघाडी मजबूत ठेवायची आहे. महाविकास आघाडीमध्ये महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी तुमची जास्त ताकद असायला हवी. पूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या म्हणून राष्ट्रवादी लहान भावाची भूमिका घ्यायची. मात्र, आता काँग्रेसच्या 44 जागा आहेत आणि आमच्या 54 जागा आहेत. त्यामुळे आता आम्ही मोठा आणि काँग्रेस लहान भाऊ झाला आहे.”

महत्वाच्या बातम्या