Devendra Fadnavis Vs Manoj Jarange । मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले असून जरांगे त्यांच्या सागर बंगल्याच्या (मुंबई) दिशेने रवाना झाले आहेत.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठीची भावना होती तेव्हा मी त्याच्याबरोबर होतो. मात्र, आता त्याची भाषा राजकीय वाटतं आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. मनोज जरांगे यांना कोणाचंही ऐकू नये, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये. सरकारने संयम ठेवलेला आहे अंत पाहू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंवर पोलीस कारवाईचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब बोलत होते. तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलता आहेत हा प्रश्न आहे.
Police action against Manoj Jarange । Devendra Fadnavis
आम्ही योग्यवेळी बाहेर काढू, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या