Nana Patole | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती चांगली नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रपती लागवड लागू करण्याची मागणी केली आहे.

The ruling party has nothing to do with the people’s issue – Nana Patole

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “सत्ताधारी पक्षाला जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं नाही. भाजपनं निवडणुकांच्या वेळी जनतेला मोठमोठी आश्वासनं दिली. त्यानंतर राज्याच्या जनतेनं त्यांच्या 105 आमदारांना निवडून दिलं. मात्र, जनतेच्या लक्षात ही चूक लगेच आली. अली बाबांचे ज्याप्रमाणे चाळीस चोर होते. तीच स्थिती सध्याच्या सरकारची झाली आहे.”

पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “भारतीय जनता पक्षानं राज्याचा चेहरा विद्रूप करून टाकला आहे. ईडीची भीती घालून विरोधकांवर ते दबाव निर्माण करत आहेत. त्याचबरोबर चांगल्या खात्यांसाठी खाते वाटप थांबले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करण्यात यावी.”

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आज किंवा उद्या होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात नाना पटोले (Nana Patole) यांच्या या मागणीनंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. नाना पटोले यांच्या या मागणीवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.