Manoj Jarange यांच्यावर गंभीर आरोप केल्याने बच्चू कडू यांनी बारसकर महाराजांची प्रहार पक्षातून केली हकालपट्टी

manoj jarange bacchu kadu Ajay Baraskar

Manoj Jarange VS Ajay Baraskar | अजय महाराज बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केल्याने बच्चू कडू यांनी बारसकर महाराजांची प्रहार पक्षातून हकालपट्टी केली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. बारस्कर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. पक्षाचा जरांगे यांना पाठिंबा असताना वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच बारस्कर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नाही, पक्षाची ती अधिकृत भूमिका नसल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

पक्षातील कोणत्याही व्यक्तीने मनोज जरांगे पाटील, मराठा नेते आणि मराठा आरक्षणावर भाष्य करू नये. भूमिका मांडू नये. तसं केल्यास त्या व्यक्तीला पक्षातून काढलं जाईल.

त्याचा पक्षाशी काहीच संबंध राहणार नाही, अशी तंबीच बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच या पुढे मनोज जरांगे, मराठा आरक्षण आणि मराठा नेत्यांबाबत केवळ बच्चू कडूच भूमिका मांडतील, असंही या पक्षादेशात म्हटलं आहे.

Ajay Baraskar LIVE: सहकाऱ्याचं मनोज जरांगे वर गंभीर आरोप

Manoj Jarange Patil LIVE | बारसकर महाराज यांच्या गंभीर आरोपांना जरांगे यांचे उत्तर

काय म्हणाले होते Ajay Baraskar महाराज ?

मनोज जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत आहे. त्यांना सरकारला वेठीस धरायचं आहे. जरांगे यांच्या मागे अदृश्यशक्तीचा हात आहे. जरांगे वारंवार आपली मागणी बदलत आहे.

बारस्कर यांनी जरांगे यांची अक्कल काढत जरांगेमुळे राज्यातील एक नेता मोठा होतोय असे सांगितले. मराठ्यांनी हे शोधावे की त्यांच्या मागे कोण आहे? जरांगे हे स्वत:ला देव समजू लागले आहेत. आमचा त्यांना विरोध आहे.

जरांगे यांना कायदा माहीत नाही. त्यांना बोलता येत नाही. त्यांना आयुष्यभर आंदोलनच करायचं आहे. त्यांना मोठ्ठं व्हायचं आहे. केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.