Kolhapur | कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kolhapur | कोल्हापूर: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात काल तीव्र आंदोलन झालं. शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले होते. त्यानंतर कोल्हापूर शहर बंद करण्यात आलं असून शहरातील इंटरनेट सेवा देखील बंद केली होती.

Kolhapur city seems to be recovering

आज (08 जुन) कोल्हापूर शहर (Kolhapur) पूर्वपदावर येताना दिसून आलं आहे. सकाळपासून शहरातील विविध भागात दुकान उघडण्यात आली आहे. तसेच शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर आज सकाळपासून शहरातील बहुतांश भागांमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

काल (07 जुन) हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूरच्या (Kolhapur) शिवाजी चौकात मोर्चा काढत गर्दी केली. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये दगडफेक देखील झाली होती. या घटनेनंतर कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आला होता. मात्र, आज शहरातील बहुतांश भागांत इंटरनेट सुरळीत चालतं आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे कोल्हापूर (Kolhapur) शहरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

महत्वाच्या बातम्या