Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरामध्ये अनेक संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापणेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
खडकी कॅन्टलमेंट बोर्ड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) 97 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, माळी, ड्रेसर, वॉर्ड आया, वॉर्ड बॉय, पौंडकीपर, मजदूर, वॉचमन, शिपाई, फायरमन, सुतार, मेसन, वायरमन, स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय, परीक्षा फी आणि इतर तपशील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 3 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरून तो पुढील पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड १७, फील्ड मार्शल कॅरियप्पा मार्ग, किरकी, पुणे, पिनकोड- ४११००३
अधिकृत वेबसाइट
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1Is_AwcYJhScJrpfeh4ZNUGl8Tqr4R06K/view
महत्वाच्या बातम्या
- Shivsena | आयोगाच्या निकालानंतर शिवसेना भवनावर एकनाथ शिंदेंची सत्ता?? ; राऊत म्हणाले, “शिवसेनेची संपत्ती अन् लाखो शिवसैनिक…”
- Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो
- Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! ‘या’ बँकेत 41 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Sanjay Raut | “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा…”
- Job Vacancies | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले