मराठ्यांच्या आरक्षण कायद्याला Gunaratna Sadavarte कोर्टात चॅलेंज देणार

Maratha Reservation

Maratha Reservation । मुंबई | मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा पारित केला जाणार आहे.

मराठ्यांना आरक्षणाचा कायदा मंजूर केला तर गुणरत्न सदावर्ते या कायद्याला कोर्टात चॅलेंज देणार आहेत. मराठा आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडे राजकारण करण्यात येत असल्याचे सदावर्ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले, ”आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा एक दिवस असेल. मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट घातला जातोय. कायदा तयार करण्याची संहिता आपण विसरलोत का? मराठा आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडे राजकारण होईल.

50 टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देताय, इतरांना फक्त 37 टक्के जागा उरणार. खुले गुणवंत राहणे गुन्हा आहे का? मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. खुल्या प्रवर्गातील लोक देखील मतदार आहेत. ओबीसींच्या बाबतीत कुणबी करण केले जाऊ शकत नाही, सगेसोयरे कायदा करता येणार नाही”, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

त्यानंतर सदावर्ते सर्व आमदारांना आवाहन करत म्हणाले,” तुम्ही ममत्व ठेवू नका. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा ममत्व असलेल रिपोर्ट आहे. सरकारने कायदा केला तर परिणाम भोगायला तयार रहा. कायदा आला तर न्यायालयात जयश्री पाटील-2 नावाची केस दाखल होईल”, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

Gunaratna Sadavarte vs Manoj Jarange ( Maratha Reservation )

“कोणीतरी जरांगे उपोषणाचे ढोंग करतंय. ट्रॅक्टर असून सांगितलं नहीं ट्रॅक्टर आहे, घर असून सांगितलं नाही घर आहे. सोशल मीडियावर त्यांना सांगितलं होत तसं सांगायला. अंगठे बहाद्दर माणसांकडून सर्वेक्षण केले. सरकारला ममत्व नसले पाहिजे ही तुम्ही शपत घेता. मनोज जरांगे यांचा मोर्चाचा स्टंट होता. मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना बुमरँग केलं. जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणे चुकीचे, कारण तो जरांगे कायदा नाही”, अशी टीका सदावर्ते यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.