Hemicrania Continua | डोक्याची एक बाजू दुखत असल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय

Hemicrania Continua | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहाराच्या सवयीमुळे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला डोकेदुखी (Headache) च्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे डोकेदुखीची समस्या ही एक सामान्य समस्या बनली आहे. यामध्ये बहुतांश लोकांना डोक्याच्या एका भागात तीव्र वेदना होतात. या डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे डोक्याच्या एका भागातील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात. हे घरगुती उपाय केल्याने तुमची डोकेदुखी सहज कमी होऊ शकते. एका बाजूची डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकतात.

पुरेशी झोप (Get enough sleep-For Hemicrania Continua)

झोपेच्या कमतरतीमुळे तुम्हाला डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. तुम्हाला जर रात्री गाढ झोप लागत नसेल, तर तुम्हाला या समस्येला सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे एका भागातील डोकेदुखी कमी करण्यासाठी रात्री पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पुरेशी झोप घेतल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहू शकतात.

नियमित व्यायाम (Regular exercise-For Hemicrania Continua)

नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्यावर डोकेदुखी दूर होते आणि मेंदूचे कार्य सुधारते. त्यामुळे डोकेदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी नियमित व्यायाम करणे उपयुक्त ठरू शकते.

उपाशी राहू नका (Don’t starve-For Hemicrania Continua)

जेवण वगळल्यामुळे किंवा जेवणाच्या वेळा न पाळल्यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी वेळेवर जेवण करणे खूप महत्त्वाचे आहे. पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने शरीराला पोषण मिळते आणि डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

एका भागातील डोकेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पुढील ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

ताक (Buttermilk-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण उष्णतेवर मात करण्यासाठी ताक एक सर्वोत्तम उपाय आहे. उन्हाळ्यात नियमित ताकाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते. त्याचबरोबर तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ताक तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

नारळ पाणी (Coconut water-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ज्यांना उन्हाळीचा त्रास सहन करावा लागतो, त्यांच्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरू शकते. नारळ पाण्याचे सेवन केल्याने उन्हाळी लागण्याची समस्या कमी होऊ शकते. त्याचबरोबर नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे या उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याचे सेवन करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन देखील वाढते. त्याचबरोबर उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी उपयुक्त ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.