Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे

Summer Drinks | टीम कृषीनामा: हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उष्णतेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पोटाशी संबंधित अनेक समस्यांना झुंज द्यावी लागते. त्यामुळे या वातावरणात पोट निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे असते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे आतड्यांवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात. उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील ड्रिंक्सचा समावेश करू शकतात.

ताक (Buttermilk-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण उष्णतेवर मात करण्यासाठी ताक एक सर्वोत्तम उपाय आहे. उन्हाळ्यात नियमित ताकाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते. त्याचबरोबर तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ताक तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

नारळ पाणी (Coconut water-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ज्यांना उन्हाळीचा त्रास सहन करावा लागतो, त्यांच्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरू शकते. नारळ पाण्याचे सेवन केल्याने उन्हाळी लागण्याची समस्या कमी होऊ शकते. त्याचबरोबर नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे या उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही नारळ पाण्याचे सेवन करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन देखील वाढते. त्याचबरोबर उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी उपयुक्त ठरू शकते.

दूध आणि गुलकंद (Milk and Gulkand-Summer Drinks)

उन्हाळ्यामध्ये ज्या लोकांना व्यवस्थित झोप लागत नाही त्यांच्यासाठी दूध आणि गुलकंद एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दुधामध्ये गुलकंद मिसळून त्याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता देखील कमी होते. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी या पेयाचे सेवन केल्याने तुम्हाला व्यवस्थित झोप लागू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात गुलकंदाच्या दुधाचे समावेश करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील ड्रिंक्सचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन करू शकतात.

डाळी आणि शेंगा (Pulses and legumes-For Metabolism)

मेटॉलिझम वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळी आणि शेंगांचा समावेश करू शकतात. याच्या नियमित सेवनाने स्नायू निरोगी राहतात आणि पचनक्रिया देखील मजबूत होते. यामध्ये तुम्ही मूग, हरभरा, शेंगदाणे, मसूर इत्यादी खाद्यपदार्थांचे सेवन करू शकतात.

नारळ आणि खोबरेल तेल (Coconut and coconut oil-For Metabolism)

खोबरेल तेल आणि नारळाच्या सेवनाने शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील मेटॉलिझम नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर खोबरेल तेलाचे सेवन केल्याने वजन नियंत्रण राहू शकते. त्यामुळे नारळ आणि खोबरेल तेल तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आंबट पदार्थ (Sour food-For Metabolism)

आंबट पदार्थांचे सेवन करणे मेटॉलिझम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात संत्रा, लिंबू, द्राक्ष इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतात. या फळांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते. त्यामुळे मेटॉलिझम वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आंबट पदार्थांचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Vitamin A | शरीरातील विटामिन एची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Coconut Oil | केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलासोबत वापरा ‘या’ गोष्टी

Back to top button