Panjabrao Dakh Weather Report | येत्या आठवड्यात पावसाची शक्यता, राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा सापडणार संकटात?

Panjabrao Dakh Weather Report | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानामध्ये (Temperature) मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढल्यामुळे उन्हाच्या झळा (Summer heat) चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

येत्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Chance of heavy rain from next week)

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार (Panjabrao Dakh Weather Report), राज्यामध्ये येत्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, माजलगाव, शिरूर, शिर्डी या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

येता आठवड्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (Panjabrao Dakh Weather Report) वर्तवण्यात आला आहे. एकंदरीत येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.

या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस सुरू होण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे करून घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेतीतील पिकांची काढणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, असे देखील हवामान खात्याकडून (Panjabrao Dakh Weather Report) सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.