इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये भेट घेतली
Imtiyaz Jaleel and Manoj Jarange Patil
छत्रपती संभाजीनगर । MIM पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये भेट घेतली. भेटी दरम्यान जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. जरांगे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीच्या अंगाने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढवत आहेत. तर शिंदे गटाकडून मंत्री संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अमोल कोल्हेंचा भुजबळांबाबत मोठा गौप्यस्फोट; छगन भुजबळ म्हणाले ओबीसी समाज…!
- भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचे फोटो हटवले
- मी जर कोणाला धमकावले असते तर बारामतीकर पाठीशी राहिलेच नसते – अजित पवार