Aditya Thackeray | राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त अन् मिंधे-भाजप उद्योगधंदे परराज्यात पाठवू लागलेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

अशात शेतीशी संबंधित उद्योगधंद्यामध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर इतर उद्योगधंद्यांमध्ये देखील बेरोजगारी वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग त्रस्त आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त असताना मिंधे-भाजपा सरकार मात्र उद्योगधंदे परराज्यात पाठवून, इथे नुसतीच जाहिरातबाजी करण्यात आणि द्वेषाचं राजकारण खेळण्यात मग्न आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

The unemployment rate in the country has reached 10.05 percent in October – Aditya Thackeray

ट्विट करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) ताज्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये १०.०५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगारीचे आकडेही चिंताजनक आहेत. कृषीप्रधान देश म्हटल्या जाणाऱ्या भारतात ह्या वर्षी पाऊस कमी आणि अनियमित पडल्याने शेतीशी संबंधित उद्योगांमधे बेरोजगारी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातला तरूणही बेरोजगारीने त्रस्त आहे. त्याला रोजगाराच्या संधींची गरज आहे. पण मिंधे-भाजपा सरकार मात्र उद्योगधंदे परराज्यात पाठवून, इथे नुसतीच जाहिरातबाजी करण्यात आणि द्वेषाचं राजकारण खेळण्यात मग्न आहे.

महाराष्ट्रातला तरूण हे नक्की पाहतोय आणि लक्षात ठेवतोय. महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या तरूणांसाठी शाश्वत व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे.

नाहीतर सगळ्यात जास्त तरूण लोकसंख्या असलेल्या भारताचं प्रचंड नुकसान होईलच, पण कोट्यावधी कुटुंबांची वाताहत होईल.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.