Maharashtra Political Crisis | ‘आम्ही न्याय विकत घेणारी माणसे नाही’ – संजय राऊत

Sanajy Raut | मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी देखील महत्वाचा आहे. कारण आतापर्यंत असा बंड झाला नव्हता. यामुळे या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी काही वेळच बाकी आहे. त्याआधी खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी निकालाबाबत दावा करत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ( What did Sanjay Raut say)

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसं नाही ती माणसे मींदे गटामध्ये आहेत. आम्हाला वाटत अपात्रतेचा निर्णय झिरवळ यांच्यांकडे यावा. काही मुर्ख लोक बोलत आहेत निकाल आमच्या बाजूने लागेल त्यांना बोलू द्या. अस देखील राऊत म्हणले. याचप्रमाणे जर हे 16 आमदार अपात्र ठरले तर उरलेले 24 आमदारही अपात्र ठरतील असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी न्यायालय स्वतंत्र आहे की नाही त्याचा निर्णय आज होईल असं देखील म्हटलं आहे. तसचं राज्यात या निकालानंतर सरकार बदलणार असल्याचं देखील राऊतांनी म्हटलं आहे. यामुळे आज निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर 16 आमदार अपात्र झाले तर पुढील राजकीय समीकरणे काय असतील? असे प्रश्न उपस्थित केले जातं आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.