Devendra Fadnavis | “राज्यातील काही राजकीय पंडित…” ; सत्ता संघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय रोखून ठेवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत असलेल्या शक्यतांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्यातील काही राजकीय पंडितांनी निर्णय देऊन टाकला आहे आणि सरकारही तयार केलं आहे. हे मला योग्य वाटत नाहीये. सर्वोच्च न्यायालय खूप मोठं कोर्ट आहे. त्यामुळे सर्वांनी शांतपणे निर्णयाची वाट बघावी.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही सगळं कायदेशीर केलं आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. सुप्रीम कोर्ट योग्य तोच निर्णय देईल अशी आमची अपेक्षा आहे.”

निकाल कधी लागणार? (When will the results be available?)

न्यायमूर्ती शाह 15 मे रोजी निवृत्त होणार असल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे. सत्ता संघर्षाचा निकाल 11 किंवा 12 मे रोजी लागण्याची शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. सत्ता संघर्षावर दीर्घ युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय नक्की काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निकालाबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. काहींच्या मते शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरतील. तर काहींच्या मते हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. तर आमदार अपात्र झाले तरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धोका नसल्याचे बहुतांशांकडून म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.