Sharad Pawar | राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध ; म्हणले आम्ही…

Sharad Pawar | मुंबई : नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेत घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. नक्की कोणती मोठी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. सभागृहात या घोषनेनंतर का गोंधळ निर्माण झाला? तर शरद पवार यांनी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कार्यकर्त याला विरोध करत आहेत. मी फक्त तीन वर्षच राजकारणात आहे असं देखील पवार म्हणाले.

काय आहे शरद पवार यांचा निर्णय (What is Sharad Pawar’s decision)

आज शरद पवार यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगती’ याच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले त्यावेळी शरद पवार यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. पवार म्हणाले की, मी गेले 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. कोणत्याही माणसाला अति मोह असु नये कुठं थांबायचं याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला सर्वांना अस्वस्थता वाटू शकते पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसचं त्यांनी पुढे मी पक्षाच्या कामासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपलब्ध असेल असं देखील म्हटलं. या संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत एक समिती स्थापन केली जाईल त्यातील सदस्य निर्णय घेतील. तर दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा असं पवार म्हणाले.

दरम्यान, पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत. पवार साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर आम्ही सभागृह सोडणार नाही अशी मागणी केली . त्याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्तेच्या डोळ्यात पाणी होत. तर धनंजय मुंडे यांनी पवारांचे पाया पडून हा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तसचं पवारांसमोर अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे सभगृहात मोठा गोंधळ उडला आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.