Ind vs Ned | नेदरलँड विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग – 11 मध्ये होणार बदल? रोहित शर्मा म्हणाला…

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Ind vs Ned | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहे.

हे सर्व सामने जिंकत भारतीय संघाने उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. यादरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे.

अशात 12 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय संघाला नेदरलँडविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग – 11 मध्ये बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

There is no possibility of any change in the Indian team

रोहित शर्मा म्हणाला, “भारतीय संघातील गोलंदाजांनी अत्यंत चमकदार गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीने उत्कृष्ट कामगिरी केली.

रवींद्र जडेजा टीम इंडियासाठी एक उत्तम खेळाडू आहे. त्याने फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर मोहम्मद शमी ज्या प्रकारे परतला आहे, त्यातून त्याची खेळण्याची मानसिकता दिसत आहे.

यापुढे भारतीय संघाला आणखीन मोठे सामने खेळायचे आहे. खेळाडूंची कामगिरी बघता भारतीय संघामध्ये कोणतीही बदल होण्याची शक्यता नाही. सध्या टीम इंडियाची जी प्लेइंग 11 आहे, तीच पुढच्या सामन्यांमध्ये असू शकते.”

दरम्यान, भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याला दुखापतीमुळे वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यानंतर त्याच्या जागी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाले आहे.

दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःला सिद्ध केलं आहे. तर मोहम्मद शमीने या स्पर्धेमध्ये 4 सामन्यात तब्बल 16 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe