Kapil Sibal | ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा ट्विट करत शिंदेंवर निशाणा

Kapil Sibal | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवशीय अयोध्या दौऱ्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. विरोधीपक्ष नेत्यांकडून टीका टिपणी सुरू आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना सरकारच दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं जातं आहे. असंअसताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी देखील शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर ट्विट करत निशाना साधला आहे.

वकील कपिल सिब्बल म्हणाले की, पाठीत वार करणारे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत. तसचं पुढे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भगवान रामाने त्याग, सत्य आणि प्रामाणिकपणा निवडला. बाळासाहेबांनीही ते गुण आत्मसात केले. बाळासाहेबांचा वारसा कारस्थानी, संधिसाधू, पाठीत वार करणारे कधीही पुढे नेऊ शकत नाहीत.

तब्बल 9 महिन्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद पुर्ण झाला आहे. यामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. तर कोर्टाच्या या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. त्यानंतर आता सिबील यांनी थेट शिंदेंवर निशाणा साधत जोरदार टीका देखील केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.