Share

Sanjay Raut | अमित शाह अजित पवारांना मुख्यमंत्री करतील – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

अशात राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू असताना अजित पवारांच्या मातोश्रींनी खळबळजनक विधान केलं आहे. माझं वय आता 86 झालं आहे.

माझ्या मुलाने माझ्या हयातीत मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटतं, असं अजित पवारांच्या मातोश्रींनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह (Amit Shah) अजित पवारांना मुख्यमंत्री करतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आज अजित पवार जे काही आहे ते शरद पवारांमुळे आहे. अशात अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांची आईची इच्छा आहे.

परंतु, प्रत्येक आईची इच्छा असते की आपला मुलगा पंतप्रधान व्हावा, मुख्यमंत्री व्हावा, राष्ट्रपती व्हावा. यानंतर मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार अमित शाहांकडे गेले तर अमित शाह त्यांना मुख्यमंत्री करतील.”

Ajit Pawar’s mother has prayed for his dreams – Vijay Wadettiwar

दरम्यान, अजित पवारांच्या मातोश्रींच्या वक्तव्यावर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “अजित पवारांच्या आईंनी त्यांच्या स्वप्नांसाठी प्रार्थना केली आहे. आई म्हणून त्यांची प्रार्थना अत्यंत स्वभाविक आहे. त्यांची ही प्रार्थना अजित पवारांच्या स्वप्नांना भरारी देणारी ठरो. अशात अजित पवारांचं  मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन झालं तर त्यांच्या आईचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं.”

महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now