Sanjay Raut | नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं धमकी देतंय – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सद्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी नेत्यांवर टीकेचे बाण सोडत आहेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळावर एक भाष्य केलं यामुळे विधिमंडळात गदारोळ झाला. हे विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे असे वादग्रस्त वक्तव्य राऊत यांनी केले होते. यावर नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. फक्त १० मिनिटांसाठी त्याचं संरक्षण हटवलं तर ते दिसणार नाहीत. अशी धमकी नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिली. यावर आता संजय राऊत देखील संतापले आणि नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊतांचं प्रत्युत्तर : Sanjay Raut Answerd To Nitesh Narayan Rane

राणेंच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत नितेश राणेंचे चांगलेच कान टोचले आहेत. नितेश राणेंनी संरक्षण काढा अस म्हटल्यावर त्यावर त्यांनी नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं धमकी देतंय अस वक्तव्य कोल्हापूर येथील सभेत केलं. पुढं ते म्हणाले की; संरक्षण काढायचं तर काढ ना… सरकार कुणाच आहे…? संरक्षण काढ. जेव्हा कोकणात शिवसैनिक गेले होते. तेव्हा त्यानी स्वतःला कोंडून घेतलं होतं. १०० बोगस कंपन्या आहेत.

ते आधी शिवसेनेत नंतर कॉंग्रेस आणि त्यानंतर भाजपमध्ये थेट प्रवेश केला. ते आम्हाला शिवसेनेबाबाबतची निष्ठा समजून सांगत आहेत. शिवसेनेनं मोठं केलं. शिवसेनेनं मुख्यमंत्री केलं. ते डरपोक लोकं ते काय लढणार. अस प्रत्युत्तर संजय राऊत यांनी नितेश राणेंना दिलं आहे.

 संजय राऊत ( Sanjay Raut Controversial Statement )

ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे.  आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.