Thursday - 8th June 2023 - 4:54 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Priya Berde – कलाकारांच्या व्यथा मांडताना प्रिया बेर्डे यांना अश्रू अनावर

Priya Lakshmikant Berde Pune

by MAHARASHTRA DESHA
12 April 2023
Reading Time: 1 min read
Priya Berde - कलाकारांच्या व्यथा मांडताना प्रिया बेर्डे यांना अश्रू अनावर

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन हल्ले केले जातात, हे निषेधार्ह आहे.

Share on FacebookShare on Twitter

Priya Berde । पुणे : पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. प्रत्येक कलाकाराला न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. शेवटी निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, मी माझे काम निष्ठेने करत राहील असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याबाबत त्या म्हणाल्या, ”भाजपमध्ये काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाते. येथे काम करण्यासाठी मोठी स्पेस आहे. एखादा प्रश्न आपण वरिष्ठ नेते म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांच्यासमोर घेऊन गेलो की ते प्रश्न लगेच मार्गी लागतात. वाशी येथे धो धो पावसातही सुधीरजी मुनगंटीवार साहेब पुरस्कार द्यायला आले.

कलाकारांना वेगळी वागणूक आणि खूप हीन दर्जाचे जेवण 

पुढे त्या म्हणाल्या, ”मला अभिनय क्षेत्राची खूप मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामुळे मला चित्रपट क्षेत्रातील अत्यंत खालच्या घटकांपासून वरपर्यंतच्या सर्वच घटकांची म्हणजे कलाकार, तंत्रज्ञ, लाईटमन, स्पॉटबॉय यांची बारीकसारीक माहिती आहे. या सगळ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून खूप जवळून मी पाहिल्या आहेत. अनेकदा कलाकारांना वेगळी वागणूक दिली जायची, तंत्रज्ञ यांना वेगळी वागणूक दिली जायची. यांना जेवण देखील खूप हीन दर्जाचे दिले आहे जायचे. माझ्या वडिलांनी अनेकदा खिशातील पैसे खर्च करून या घटकांसाठी काम केले आहे. त्यांच्यामुळे या सर्व घटकांविषयी मला तळमळ आहे. या सर्व मुद्यांवर मी खूपदा भांडले आहे. मला पहिल्यापासून या लोकांसाठी काहीतरी आपण पुढाकार घेऊन करावे असे वाटत होते. कोरोनाच्या काळात ही संधी मला उपलब्ध झाली. या काळात कलाकार, तंत्रज्ञान व अभिनय क्षेत्रातील लोकांची वाईट अवस्था झाली होती. कोरोनाच्या काळात ज्युनिअर आर्टिस्ट, हेअरस्टाईलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, स्पॉटबॉय अशा अनेक लोकांची कामे गेली. या काळात लक्ष्य कला मंच, श्रीमंथ इंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थामार्फ़त मी आणि माझे बिझनेस पार्टनर अमर गवळी आम्ही सर्व लोकांना फूड पॅकेट पुरविण्यापासून ते जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. तसेच पुणे इतर ठिकाणच्या 100 लोकांचा विमा देखील उतरवला.

मराठी चित्रपटांसाठी पाया पडावे लागते

पुढे त्या म्हणाल्या, ” राज्यातील 600 सिंगल स्क्रिन थिएटरची दुरवस्था झाली आहे. यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतके थिएटर सुरू आहेत. मल्टीफ्लेक्समध्ये तर आम्हाला शोच मिळत नाहीत. थिएटर दिले तरी आम्हाला शो मिळतच नाहीत. आणि शो जर दिले तर मोठी बिग बजेटची इंग्लिश किंवा हिंदी फिल्म आली तर मराठी चित्रपटांसाठी त्यांच्या पाया पडावे लागते ते ही आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय करायचे कलाकारांनी, कसे जगायचे? सध्या आम्ही पाठपुरावा करून एक खूप मोठे काम केले आहे. आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगुटीवर साहेब यांनी नाट्यगृहासाठी 25 कोटींचे अनुदान घोषित केले आहे. यामुळे नाट्यगृहांमध्ये सुधारणा होईल. तमाशा व लोककलावंत यांना कोरोना काळात अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. काहींना तर लोकांची धुणी-भांडी करावी लागली. कलाकारांची एवढी वाईट अवस्था पाहवत नाही.

लक्ष्मीकांत बेर्डे ( Lakshmikant Berde ) यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन हल्ले 

लक्ष्मीकांत बेर्डे ( Lakshmikant Berde ) यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन हल्ले केले जातात, हे निषेधार्ह आहे. म्हणजे ज्या माणसाला आज जाऊन आता 18 ते 19 वर्षे झाली, तसेच ज्या माणसाचे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान आहे, अशा व्यक्तीवर ज्यांना काहीच बोलायचा अधिकार नाही. ज्यांची समाजात काहीच प्रतिमा नाही असे लोकं बेर्डे साहेबांवरती व्यक्त होतात याचेच मला नवल वाटते. याबद्दल तुम्ही मीडियाने देखील आवाज उठवायला हवा.

महत्वाच्या बातम्या –

  • Job Opportunity | केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
  • Ajit Pawar । अजित पवार भाजप बरोबर जाणार? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या…
  • Onion Benefits | उन्हाळ्यामध्ये दररोज कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
  • Job Opportunity | महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (MKSS) यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Sanjay Raut | “तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात” : संजय राऊत
SendShare68Tweet15Share
Previous Post

Mail Motor Service | मेल मोटर सर्विस यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Next Post

Sandalwood Powder | उन्हाळ्यामध्ये चेहरा थंड ठेवण्यासाठी चंदनाच्या पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर

ताज्या बातम्या

No Content Available

महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांना दिल्या 'या' सूचना
India

Sharad Pawar – शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार ? – शरद पवार

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया 'या' तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर
cricket

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे - सुप्रिया सुळे
Editor Choice

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप
Editor Choice

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप

NEWSLINK

Sanjay Raut | शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे – संजय राऊत

Weather Update | वातावरणात पुन्हा होणार बदल! ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता

Love Jihad | ज्या तरुणीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला, तिच मुस्लिम प्रियकरासोबत झाली फरार

Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात

Weather Update | अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सक्रिय, मान्सूनवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

WTC Final | WTC फायनल पूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत भर! संघातील ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखाप्रतग्रस्त

Sachin Tendulkar | मूग गिळून गप्प का? काँग्रेसने सचिनच्या घराबाहेर लावले पोस्टर

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In