Maratha Reservation | छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने Eknath Shinde खोटं बोलू नका – जितेंद्र आव्हाड

Maratha Reservation Jitendra Awhad vs Eknath Shinde

Maratha Reservation | विधानसभेत मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे.

राज्य सरकारने  मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात 10 टक्के आरक्षण देणारा कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय.

Jitendra Awad यांचा ट्वीट करत Eknath Shinde वर हल्लाबोल 

मराठा आरक्षणावरून गेले अनेक महिने सरकार फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे.आरक्षणाला आमचा विरोध नाही.त्यामुळे सरकारने याविषयीच्या कोणत्याही निर्णयात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही.आरक्षणाचा निर्णय हा सर्वपक्षीय एकमतानेच झालेला निर्णय असेल,हे लक्षात असू द्या.

मुंबईच्या मोर्च्यात ‘सगेसोयऱ्यां’वरून दिलेल्या शब्दाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.ज्यांच्या नोंदीच सापडलेल्या नाहीत त्यांचं आरक्षण मराठा समाजावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय.सरकार यासाठी वेळकाढूपणा का करतंय?

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली असली तरी ते कायद्याच्या कसोटीवर कितपत उतरेल आणि मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का..? यात शंकाच आहे.

वाईट तर याचं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि शपथ पूर्ण न करताच स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत.

मराठा आरक्षण जोवर कायद्याच्या कसोटीवर खरे उतरत नाही आणि ते प्रत्यक्षात लागू होत नाही, तोवर या शपथेचं ओझं मुख्यमंत्र्याना वाहावे लागेल, हे लक्षात असू द्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.