Hardik Pandya | टीम इंडियाच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत सात सामने खेळलेले असून सर्व सामने आपल्या नावावर केले आहे.

यानंतर टीम इंडियाने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. अशात भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये मोठा धक्का बसला आहे.

टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाला त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.

Hardik Pandya was injured during the match against Bangladesh

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुखापत झाली होती. गोलंदाजी करत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली.

या घटनेनंतर तो लगेच मैदानाबाहेर जाताना दिसला. यामुळे तो या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकू शकला. यानंतर तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये होता.

त्यानंतर त्या ठिकाणी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसची चाचणी सुरू होती. यानंतर हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे विश्वचषकापासून लांब राहावे लागणार आहे. याबाबत आयसीसीने माहिती दिली आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश सामना सुरू असताना गोलंदाजी करत असताना हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुखापतीवर उपचार घेत होता.

अशात आयसीसीने टीम इंडियाच्या चिंतेत भर पाडणारी माहिती दिली आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या विश्वचषकाबाहेर पडला आहे. हार्दिकच्या जागी संघामध्ये प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.

प्रसिद्ध कृष्णा राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करत होता. त्यानंतर स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यावर प्रसिद्ध कृष्णाचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe