CM Fellowship | सीएम फेलोशिप उपक्रम सुरू, इच्छुक उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CM Fellowship | टीम कृशिनामा: राज्य सरकार विविध भरती प्रक्रिया आणि उपक्रमाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देत असते. राज्य सरकार युवकांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 2 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप (CM Fellowship) उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तरुण आणि होतकरू मुला-मुलींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 2015 ते 2020 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे यामध्ये खंड पडला होता. आता पुन्हा एकदा हा उपक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप 2023 (CM Fellowship) साठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या उपक्रमामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 26 वर्ष दरम्यान असावे. त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 60 टक्के गुणांसह पदवी व एक वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन परीक्षा, निबंध आणि मुलाखत अशा वेगवेगळ्या चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे या फेलोशिपसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये 60 युवक मुख्यमंत्री फेलोंची  निवड करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे फेलो वर्षभर काम करतील.

अधिक माहितीसाठी संपर्क (Contact for more information)

मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://mahades.maharashtra.gov.in/jsp/csrferror.jsp या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर इच्छुक उमेदवार अधिक माहिती मिळवण्यासाठी या cmfellowship-mah@gov.in ई-मेलवर संपर्क साधू शकतात.

महत्वाच्या बातम्या

Periods Cramps | मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Weather Update | राज्यात ‘या’ भागात थंडीचा जोर वाढणार, हवामान खात्याने वर्तवली शक्यता

Alovera | केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडीसोबत वापरा ‘या’ गोष्टी

Hair Mask | केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी वापरा ‘हे’ हेअर मास्क

Valentine Day | जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.