Ashwini Jagtap | पुणे: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. या निवडणुकीत चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini laxman Jagtap ) यांना बिनविरोध निवडून द्या म्हटलं जातं होतं. परंतु राहुल कलाटे यांनी त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यामुळे अश्विनी जगताप यांनी ही निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांना ३९०९१ एवढी मतं मिळाली. नाना काते यांना ९९ हजार मतं तर राहुल कलाटे यांना ४४ हजार मतं मिळाली आहेत.
“गड आला पण सिंह गेला” – Ashwini laxman Jagtap
अश्विनी जगताप म्हणाल्या की ; “मला आणखी लीड मिळेल. अजूनही आमच्या बालेकिल्ल्यात मतमोजणी सुरू आहे. ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अस त्या म्हणाल्या.
गड आला पण सिंह गेला, लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आम्हा सर्वांना गड राखायचा होता तो आम्ही राखला” अस त्या माध्यामंशी बोलत होत्या.
“लक्ष्मण जगताप यांना हा विजय समर्पित”: Ashwini laxman Jagtap
मला सुरुवातीपासूनच पूर्णपणे विश्वास होता. हा विजय लक्ष्मण जगताप आणि सर्व सामान्यांचा विजय असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच माझे दार सर्वांसाठी उघडे असेल. वरिष्ठ नेते सांगतील तेव्हा मी अधिवेशनाला जाईल. मी सर्वसामान्यांचा आमदार म्हणून काम करेल अस त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | “कसब्याच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पुन्हा येऊ”
- “गड आला पण सिंह गेला…”; विजयानंतर अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया
- Ashwini Jagtap | “गड आला पण सिंह गेला”; कलाटेंच्या बंडखोरीचा अश्विनी जगताप यांना फायदा?
- Supriya Sule | “मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे परत सिद्ध झालं, जनतेनं खोटेपणाला नाकारलं”