Ajit Pawar । पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले…

Ajit Pawar । पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलं की, जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत राहाणार. त्यानंतर देखील वेगवेगळ्या विषयावरून अजित पवार हे बंड करणार असल्याचं बोललं जातं आहे. तर आज मुंबई येथे अजित पवार दिवसभर पुण्यात वेगवेगळ्या कामासाठी असणार आहेत. यांनी आज पत्रकार परिषद घेवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की राज्यातील ३१ जिल्हा बँकांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानी आहे. बँकेने मागील वर्षी ढोबळ नफा ३५१ कोटी ४१ लाख मिळाला आहे. याचप्रमणे त्यांनी आगामी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार (What did Ajit Pawar say)

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळी पोटनिवडणूक लागेल त्यावेळी आम्ही महाविकास आघाडी मधील नेते एकत्र बसून कोणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा करू, तेथील राजकीय परिस्थिती काय आहे, कोणाची तिथ ताकत आहे. मागील काळात झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मविआच्या कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या आहेत, कोणाचे किती नगरसेवक आहेत. या सगळ्यांवर चर्चा करून या जागेवर निर्णय घेवू” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान,काही दिवसापुर्वीच भाजपचे खासदार गिरीश बापट यांच निधना झालं. यानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पोटनिवडणुक जाहीर होण्या आगोदरच पुण्यात भावी खासदार म्हणून भाजप-राष्ट्रवादीच्या इच्छूक नेत्यांचे बॅनर लागले होते. राष्ट्रवादीकडून शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यामुळे पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर भाजपची देखील या निवडणुकीसाठी तीन नाव चर्चेत आहे. यामुळे आगामी पोट निवडणूक पुणेकरांसाठी महत्वाची असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.