Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी संकट! ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात पुढचे दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), पुढील दोन दिवस विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची आणि धान्याची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहे. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.

राज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे 20 मे रोजी नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे (Weather Update) नदी-नाल्यांना पूर आले. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

दरम्यान, यावर्षी मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली. मात्र, उशिराने दाखल होणारा पाऊस 19 मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला आहे. त्यामुळे यावर्षी वेळेतच पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.