Lost Mobile | तुमचा मोबाईल हरवला तर काय करायचं? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Lost Mobile | टीम महाराष्ट्र देशा: सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. त्याचबरोबर मोबाईल चोरीचे प्रकरणं वाढली आहेत. अशात आपण मोबाईल हरवल्यावर बऱ्याचदा तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. मात्र, सायबर टेक्नॉलॉजीच्या वापराने आपला मोबाईल परत मिळू शकतो. हरवलेला मोबाईल शोधून काढण्यासाठी शासनाने एका पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही हरवलेला मोबाईल सहज सापडू शकतात.

मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला (Lost Mobile) तर आपल्याला खूप मनस्ताप होतो. त्याचबरोबर मोबाईल चोरीला गेल्यावर आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि हा मनस्ताप कमी करण्यासाठी शासनाने हे पोर्टल सुरू केले आहे.

तुमचा मोबाईल चोरीला (Lost Mobile) गेल्यावर आर्थिक नुकसानासोबतच वैयक्तिक माहिती, फोटो, कागदपत्रे इत्यादी गोष्टी लिक होण्याचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी तुम्ही शासनाच्या या पोर्टलची मदत घेऊ शकतात. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल सहज शोधू शकतात.

हरवलेला मोबाईल कसा शोधायचा? (How to find a lost mobile?)

  • तुमचा मोबाईल हरवल्यावर सर्वप्रथम तुम्हाला जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी लागेल.
  • त्यानंतर हरवलेल्या मोबाईलमधील सिम कार्ड तुम्हाला ब्लॉक करून घ्यावे लागेल.
  • ब्लॉक केलेल्या नंबरचे तुम्हाला दुसरे सुरू सिम कार्ड घ्यावे लागेल आणि ते सिम कार्ड CEIR वर रजिस्टर करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला Block Stolen/Lost Mobile या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला आवश्यक ती माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडावी लागेल. यामध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनला नोंद केलेल्या तक्रारीची प्रत, मोबाईल खरेदी बिल आणि शासकीय ओळखपत्र, ही कागदपत्रे सबमिट करावे लागतील.
  • मग तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर तक्रार नोंदवल्याचा रिक्वेस्ट नंबर मिळेल.
  • हरवलेला मोबाईल Active किंवा On झाल्यावर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर SMS व्दारे त्याची माहिती मिळेल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.