Rain Update | राज्यात पुढील 48 तास अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच थंडी संपून उन्हाच्या झळा (Summer heat) जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत उन्हाचा चटका वाढत असताना अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात 8 मार्चपर्यंत विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता (Rain Update) हवामान  खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीतील रब्बी पिकांना नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. शेतीतील गहू, हरभरा, मक्का या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर गव्हाच्या पिकावर रोग पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, निफाड, पिंपळगाव या परिसरामध्ये आज सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. या अवकळी पावसाचा फटका द्राक्ष, कांदा इत्यादी पिकांना बसणार आहे. या संकटाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे.

दरम्यान औरंगाबाद, पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अमरावती, अकोला, भंडारा, जळगाव, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून सातत्याने केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.