Ashadhi Wari | “…नाहीतर वारी थांबवली जाईल”; वारकरी साहित्य परिषदेचा राज्य शासनाला थेट इशारा

Ashadhi Wari | पंढरपूर: वारकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव आषाढी वारी लवकरच सुरू होणार आहे. पांडुरंगाच्या या वारीमध्ये लाखो भाविक विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने चालत जातात. मात्र, आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी वारी बंद करू, असा इशारा वारकरी साहित्य परिषदेने राज्य शासनाला दिला आहे.

The state government should give a subsidy of Rs 50 thousand

आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) येणाऱ्या मानाच्या पालख्या आणि आणि सर्व दिंड्यांना राज्य सरकारने प्रत्येकी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेने केली आहे. आमची मागणी तात्काळ मान्य न केल्यास वारी थांबवण्यात येईल, असा इशारा देखील वारकरी साहित्य परिषदेने राज्य शासनाला दिला आहे.

“वारीसाठी (Ashadhi Wari) येणारा प्रत्येक भाविक कष्टकरी वर्गातला असतो. आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही कित्येक भक्त वारीला येतात. त्यामुळे सर्व भाविकांना सरकारने अनुदान द्यावे”, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी राज्य शासनाकडे  केली आहे.

दरम्यान, 20 जुन ते 4 जुलै या कालावधीमध्ये मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने जाणार आहे. या वारीदरम्यान (Ashadhi Wari) लाखो भाविक एकत्र येतात. त्यामुळे पालखी मार्गावर माध्यम खाजगी संस्था आणि इतर अन्य संस्थेकडून पालखी सोहळ्याचे चित्रीकरण केले जाते. पालखी सोहळ्यामध्ये केले गेलेल्या चित्रीकरणाचा गैरफायदा होऊ नये, म्हणून ड्रोन कॅमेऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version