Maratha Reservation | CM शिंदेंची शपथ खरी कशी मानायची? मराठा समाजाची आक्रमक भूमिका

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला एक महिन्याहून अधिक कालावधी दिला होता.

परंतु, या कालावधीत राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं.

छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर सकल मराठा समाजाचे समन्वय ॲड. बाबा इंदुलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शपथ कशी मानायची? असं त्यांनी म्हटलं आहे.

Adv. Baba Indulkar commented on Maratha Reservation

ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, “कोर्टात घेतलेल्या शपथीवर लोक सर्रास खोटे बोलतात, असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. अशात मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे.

मात्र, त्यांचा पूर्वीचा इतिहास पाहता, त्यांच्या शपथेवर विश्वास ठेवता येत नाही. 2018 आणि 2014 मध्ये काय घडलं? याचं त्यांनी आधी उत्तर द्यायला हवं.

आम्ही कोर्टात टिकणारं आरक्षण (Maratha Reservation) मराठा समाजाला देऊ, असं ते म्हणतात. त्यांनी आम्हाला त्यांची भूमिका स्पष्टपणे समजावून सांगितली पाहिजे.”

दरम्यान, मराठा समाजाचं (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. अशात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतमधील तीन सदस्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन टाळाटाळ करत असल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देत त्यांनी मनोज जरांगे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राजाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.