Railway Recruitment | रेल्वेत नोकरीची संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

Railway Recruitment  : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 550 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये फिटर – 215 पदे, वेल्डर – 230 पदे, मेकॅनिस्ट – 5 पदे, पेंटर – 5 पदे, सुतार – 5 पदे, इलेक्ट्रिशियन – 75 पदे, AC आणि REF मेकॅनिक – 15 पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी http://rcf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटला जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://rcf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती मोहिमेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा अधिक आणि 24 वर्षाच्या आत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना दहा रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.

रेल्वे कोच फॅक्टरीच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://rcf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.