PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज ‘या’ वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तेराव्या हप्त्यासाठी सरकारने कडक नियम जारी केले आहे. कारण या योजनेतील बारावा हप्ता मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बघणावटी कागदपत्रांची मदत घेतली होती. त्यामुळे तेरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि ई-केवायसी करून घेणे अनिवार्य केले आहे. अशाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तेरावा हप्ता आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार आहेत.

या योजनेतील तेरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांवर पाठवणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटींपेक्षा अधिक रुपये जमा केले जाणार आहेत. आज दुपारी 3 वाजता पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता जारी करण्यात येणार आहे.

योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10.45 कोटींवर पोहोचली (The number of beneficiaries of the scheme reached 10.45 crores)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील बारावा हप्ता पाठवला होता. देशातील करोडो शेतकऱ्यांनी या योजनेतील 12 व्या हप्त्याचा लाभ घेतला आहे. 2019 मध्ये जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली होती तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 3.16 कोटी होती. 2022 मध्ये ही संख्या 10.45 कोटी पर्यंत पोहोचली आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकार सातत्याने अपात्र शेतकऱ्यांना यादीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

पीएम किसान योजना हेल्पलाइन नंबर (PM Kisan Yojana Helpline No)

शेतकरी पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर क्रमांक 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800-115-526 आणि 011-23381092 या नंबर वर कॉल करू शकतात. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकतात किंवा पीएम किसान योजनेच्या संबंधित प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीद्वारे देखील आपली समस्या कळू शकतात.

महत्वाच्या बातम्या

Ayurvedic Tips | आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटू लागल्यावर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश

Periods Mood | मासिक पाळी दरम्यान मुड स्विंग टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Glowing Skin | त्वचेला चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.