Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Immunity Power | टीम कृषीनामा: निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहणे खूप आवश्यक आहे. जेव्हा तुमची इम्युनिटी पॉवर मजबूत असते तेव्हा तुम्ही संसर्गजन्य आजारापासून दूर राहू शकतात. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. परंतु, या गोष्टीचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काही घरगुती पर्यायांचा अवलंब करू शकतात. हे घरगुती उपाय केल्यावर शरीराला कोणत्याही प्रकारचे हानी पोहोचत नाही. रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवण्यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकतात.

लसूण (Garlic-For Immunity Power)

लसूण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर लसणाचे सेवन करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करू शकतात. यासाठी तुम्हाला लसूण ठेचून त्याची पेस्ट बनवून घ्यावी लागेल. या पेस्टमध्ये तुम्हाला मध मिसळून घ्यावा लागेल. या पेस्टचे सकाळी किंवा संध्याकाळी नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

आले (Ginger-For Immunity Power)

आल्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा आले ठेचून एक कप पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पाणी कोमट झाल्यावर गाळून प्यावे लागेल. तुम्ही आठवड्यातून एकदा या पेयाचे सेवन करू शकतात. या पियाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासोबतच तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

ग्रीन टी (Green tea-For Immunity Power)

शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीची मदत घेऊ शकतात. ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट गुणधर्म शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मोसमी आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचे सेवन करू शकतात.

किवी (Kiwi-For Immunity Power)

किवीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. त्यामुळे नियमित किवीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. त्याचबरोबर किवी खाल्ल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. किवीच्या मदतीने पचनक्रिया देखील मजबूत होते. त्याचबरोबर किवीचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर हार्मोन्स नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचे सेवन करू शकतात.

ब्रोकोली (Broccoli-For Hormonal Control)

शरीरातील हार्मोन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकतात. ज्या लोकांच्या शरीरात इन्स्ट्रोजन हार्मोनची पातळी खूप कमी आहे, त्यांच्यासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर इतर अनेक हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी ब्रोकोली उपयुक्त ठरू शकते.

कोबी (Cabbage-For Hormonal Control)

शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी कोबीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. कोबीमध्ये आढळणारे घटक शरीरातील हार्मोनसी पातळी राखण्यास मदत करतात. कोशिंबीर, भाजी आणि इतर अनेक प्रकारे तुम्ही कोबीचा आहारात समावेश करू शकतात.

टोमॅटो (Tomato-For Hormonal Control)

शरीरातील हार्मोन्स नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही टोमॅटोचे सेवन करू शकतात. टोमॅटोमध्ये आढळणारे गुणधर्म शरीराला अनेक गंभीर समस्यांपासून वाचवण्याचे काम करतात. त्यामुळे टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलनात राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Papaya and Besan | चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी बेसन आणि पपईचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Cucumber Benefits | त्वचा निरोगी राहण्यापासून ते वजन नियंत्रणात राहण्यापर्यंत ‘हे’ आहे रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे

Pomegranate Benefits | डाळिंबाचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात ‘हे’ फायदे

Vitamin D | सप्लीमेंट्स नाही, तर ‘या’ पदार्थांचे सेवन करून विटामिन डीची कमतरता करा दूर

Benefits of Pulses | दररोज कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.