Maratha Reservation | आज होणारी भेट उद्यावर ढकलली; राज्य शासनाचं शिष्टमंडळ उद्या जरांगेंना भेटणार

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटून उठला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांचं हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरलं. हे आंदोलन तीव्र होत असताना राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.

त्यांच्या विनंतीचा मान राखत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेणार होतं. परंतु, ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेणार होतं. परंतु, त्यांनी ही भेट उद्या वर ढकलली आहे.

आज जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला. त्यामुळे मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची आज होणारी भेट उद्या होणार आहे.

Manoj Jarange will be touring the state

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी मागे घेतलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राज्यात दौरे करणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी 1 डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. तर जरांगे यांनी याबद्दल निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 जानेवारी तर मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबर डेडलाईन असल्याचं सांगितलं आहे. याबद्दल चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.

महातवाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.