Shivsena | “या निवडणुकीच्या निमित्ताने तांब्याचे पितळ होईल”; शिवसेनेची सत्यजीत तांबेंवर टीका

Shivsena | मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. त्यामुळे आता या सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवलेल्या शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी सत्यजित तांबे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“त्यांनी सध्या निष्ठा कमी आणि निसटणे जास्त आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तांब्याचे पितळ होईल, हे लक्षात ठेवा. त्यांचे नाव जरी सत्यजित असले, तरी हे लोक त्यांना या निवडणुकीत पाडतील. शुभांगी ताई तुमच्या नावात शुभ आहे आणि उद्या आमच्या सोबत शुभ होणार आहे,” असा विश्वास यावेळी अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

“2014 साली निवडणूक प्रचारासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी 27 सभा घेतल्या होत्या. एवढ्या सभा कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नव्हत्या. इतक्या सभा घेऊनही नरेंद्र मोदी यांच्या छाताडावर बसून उद्धव ठाकरे यांनी 63 आमदार निवडून आणले होते. आमचे प्रबोधनकार म्हणायचे, दारूची नशा जाते, मात्र सत्तेची नशा जात नाही. लढाऊ नाही झाले तरी चालेल, पण विकाऊ होऊ नका असं म्हणत बंडखोर आमदारांना त्यांनी टोला लगावला आहे.” असा टोला त्यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Exit mobile version