Muslim Reservation | मराठा समाजानंतर मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी; घेतली शरद पवारांची भेट

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Muslim Reservation | मुंबई: गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे.

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. यानंतर मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटप सुरू असून राज्यात इतर भागात नोंदींचा अभ्यास केला जात आहे. अशात मराठा समाजानंतर मुस्लिम समाजाने आरक्षणाची मागणी घातली आहे.

Maratha community is agitating for reservation

राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असताना मुस्लिम समाजाने आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी केली आहे.

या मागणीसाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली.

शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. परंतु, सध्याचं सरकार त्याची अंमलबजावणी करत नसल्यामुळे शरद पवारांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी या संघटनेने केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. परंतु, मनोज जरांगे यांनी ही मुदत देण्यास नकार दिला.

त्यानंतर जरांगे यांनी राज्य शासनाला या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी 24 पर्यंत वेळी दिला आहे. मात्र, राज्य सरकारकडून ही मुदत 2 जानेवारीपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर डेडलाईनबाबत स्पष्टता होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe