Karnataka Election Result | कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Karanatka Election Result | मुंबई : आज (13मे) सकाळपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर मीडिया रिपोर्ट नुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे सर्वत्र एकच चर्चा होता पाहायला मिळते ती म्हणजे काँग्रेस बाजी मारणार. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका देखील केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले ( What did Nana Patole say)

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं निवडून येणार आहे. कारण त्या ठिकाणी सुशिक्षितांचं मतदान आहे. तुम्ही बघितलं असेल की, सध्या परिवर्तन सुरू होत आहे. यावेळी जवळपास ४५ टक्के मतदान काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल. भाजप हा लोकशाही न मानणार पक्ष आहे अशी टीका देखील पटोले यांनी भाजपवर केली आहे.

दरम्यान, पटोले पुढे म्हणाले की, जनतेने कौल दिला आहे यामुळे जनताच भाजपला कर्नाटकातून हद्दपार करेल. कारण गेल्यावेळी ४० टक्के कमिशन देऊन जिंकून आले होते परंतु त्यानंतर भाजप सरकारने ज्या लिंगायत समाजाच्या जोरावर जिंकून आले त्यांनाच वाळीत टाकण्याचं काम केलं यामुळे आता मात्र सर्वांची पसंती काँग्रेसला असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपने तिथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही. महागाई, बेरोजगार अशा प्रश्नांवर सरकारने दुर्लक्ष केलं यामुळे जनता नाराज आहे. म्हणून आता जनतेने कौल दिला आहे. याचप्रमाणे आम्ही राहुल गांधींकडे पंतप्रधान म्हणून पाहतोय असं देखील पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.