PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. अशात शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपये देते. दोन हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचवते.
शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेतील 14 हप्ते मिळालेले आहेत. तर शेतकरी आता या योजनेतील 15 व्या हप्त्याची वाट बघत आहेत. अशात 15 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Farmers can get 15th installment before Diwali
पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत. अशात दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हा हप्ता मिळू शकतो.
12 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता दिला जाऊ शकतो. परंतु, केंद्र सरकारने याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
या योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, जमिनीची पडताळणी आणि आधार कार्ड लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे.
दरम्यान, पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) पंधरावा हप्ता जारी करण्यापूर्वी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असताना देखील या योजनेचा लाभ घेतला आहे.
या सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी स्वतःला शेतकरी दाखवलं आहे. बनावटी कागदपत्र दाखवून लाभ घेणाऱ्या या सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारची कोट्यावधींची लूट केली आहे.
घटनात्मक पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नाही, असं असून देखील काही सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. हा सर्व प्रकार अमरावती जिल्ह्यामध्ये घडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; किमान 10 ते 12 दिवस रुग्णालयात राहावे लागणार
- Hardik Pandya | टीम इंडियाच्या चिंतेत भर; हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर
- Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबाला मदत; मात्र, शिंदे-फडणवीसांनी दिलेले चेक झाले बाउन्स
- Uddhav Thackeray | आपली अर्थव्यवस्था म्हणजे मोदी राजवटीतील ‘दमलेल्या’ रुपयाची कहाणी; ठाकरे गटाची टीका
- Cucumber Benefits | काकडीचे फक्त उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यात देखील आहे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या