SSC Result | 10 वी चा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

SSC Result | टीम महाराष्ट्र देशा: इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष इयत्ता दहावीच्या निकालावर लागलं आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. उद्या (2 जून) दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी 01 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

राज्यात तब्बल 15,77,256 विद्यार्थ्यांनी दहावीची (SSC Result) परीक्षा दिली होती. राज्यातील जवळपास 5033 केंद्रावर ही परीक्षा झाली होती. उद्या या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना दुपारी 01 वाजता ऑनलाईन हा निकाल बघता येईल.

10 वी चा निकाल कुठं बघायचा? (Where to see 10th result?)

10 वी चा निकाल (SSC Result) बघण्यासाठी विद्यार्थी खालील वेबसाइटला भेट देऊ शकतात.

https://mahresult.nic.in/

https://sscresult.mkcl.org/

https://ssc.mahresults.org.in/

10 वी चा निकाल कसा बघायचा? (How to check 10th result?)

दरम्यान, विद्यार्थी शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन निकाल (SSC Result) बघू शकतात. तर, निकाल लागल्यानंतर काही दिवसात विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजनल मार्कशीट त्यांच्या शाळेमध्ये उपलब्ध होतील.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version