Narendra Modi | कर्नाटक राज्यातील प्रगतीला ‘हे’ दोन्ही पक्ष सर्वात मोठे अडथळे : नरेंद्र मोदी

Karnataka Election | चन्नपट्टना (कर्नाटक): अवघ्या काही दिवसांवरच कर्नाटकची विधानसभा निवडणुक येऊन टेकली आहे. निवडणूच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात प्रचार सभा होतं आहेत. तसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. ते कर्नाटकमधील काही ठिकाणी सभा घेत असून रोड शो देखील होत आहे. तर आज ( 1मे) नरेंद्र मोदींनी सभेदरम्यान आरोप करत काँग्रेस आणि जेडीएसच कर्नाटकच्या विकासातील, प्रगतीतील अडथळा असल्याचं म्हटल आहे. जेडीएसचा बालेकिल्ला असलेल्या चन्नपटनातील सभेत पंतप्रधान बोलत होते. तर ही त्यांची पाचवी सभा होती.

काँग्रेस आणि जेडीएसच कर्नाटकच्या प्रगतीतील अडथळा : नरेंद्र मोदी ( Congress and JDS are the obstacle to Karnataka’s progress: Narendra Modi)

तसचं कर्नाटकमधील चन्नपटणा हा जेडीएसचा बालेकिल्ला समजला जातो. पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी २०१८ मध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय मिळविला होता. आता कुमारस्वामी या मतदारसंघातून पुन्हा विजय मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत.कमिशन हीच काँग्रेसची ओळख असल्याच याआधी मोदींनी म्हंटल होत तर आता कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेला घराणेशाही जोपासणारे काँग्रेस धर्मनिरपेक्ष जनता दलासारखे (जेडीएस) पक्ष जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हे दोन्ही पक्ष कर्नाटककडे एटीएम म्हणून पाहत असून त्यांना राजकीय अस्थिरतेमध्येच संधी शोधत आहेत. ते राज्याच्या प्रगतीतील सर्वांत मोठा अडथळा असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसचं हे दोन्ही पक्ष फक्त स्वतंत्र असल्याचं दाखवतात परंतु संसदेत मात्र एकत्र असतात एकमेकांना मदत करतात. याचप्रमाणे हे पक्ष घराणेशाही जोपासणारे पक्ष असून ते भ्रष्टाचाराला खातपाणी घालतात. अशा शब्दात मोदींनी टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गेलेल्या गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींना सपाची उपमा देत निशाणा साधला होता. त्याच्या या भाष्याला मोदींनी उत्तर देत म्हटलं आहे की, मी भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे, याचा सर्वात जास्त त्रास काँग्रेसला होत आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेस माझी सापाशी तुलना करत आहे आणि लोकांकडे मते मागत आहे. पण साप हा भगवान शंकराच्या गळ्याभोवती असतो. माझ्यासाठी देशातील जनता देवाचे रुप आणि शंकराचेच स्वरूप आहे. त्यामुळे ईश्वररुपी जनतेच्या गळ्यातील साप बनणे मला मंजूर आहे. कर्नाटकमधील जनता शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसला १० मे रोजी मतपेटीतून उत्तर देईल. अशा शब्दात सभेतून मोदींनी दोन्ही पक्षावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.