Raj Thackeray | सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत अजून स्पष्टता यायला हवी- राज ठाकरे

Raj Thackeray | मुंबई: काल महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलासा दिला आहे. या सर्व निर्णयावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत राज ठाकरे म्हणाले, “कोर्टाची भाषा वाचल्यावर लगेच लक्षात येत नाही. विधिमंडळातील हा गट पक्ष म्हणून मानला जाणार नाही, असं काल कोर्टाने सांगितलं. मात्र, निवडणूक आयोगाने त्या गटाला दिलेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह याचं काय? त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत अजून स्पष्टता यायला हवी.”

निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय करणार?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद होती. आम्ही राजकारणी लोकप्रतिनिधी असतो, लोकप्रतिनिधी वरून लादलेला माणूस हे शोभेचं पद नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त करताना एकतर नियमावली जारी करण्यात यावी किंवा राज्यपाल संस्था बरखास्त करण्यात यावी.”

महत्वाच्या बातम्या