Online Scams | सोशल मीडियावर पोस्ट लाइक केल्याने पुण्यातील इंजिनिअरला 20 लाखांचे नुकसान

Pune based engineer loses Rs 20 lakh after liking social media posts

Online Scams Pune
  • Pune based engineer loses Rs 20 lakh after liking social media posts

Online Scams |  ऑनलाइन घोटाळे दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. ऑनलाइन फसवणूक करून लोकांचे हजारो आणि लाखोंचे नुकसान होत आहे.  असाच एक प्रसंग पुण्यात घडला आहे. पुण्यातील इंजिनिअरला सोशल मीडियावर पोस्ट लाइक केल्याने  सुमारे 20.32 लाख रुपयांचा तोटा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील ४० वर्षीय अविनाश कृष्णाकुट्टी कुन्नूबारम यांना मार्च २०२३ मध्ये एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला तेव्हा या घोटाळ्याची सुरुवात झाली. त्या अज्ञात व्यक्तीने अविनाशला आणखी पैसे कमविण्याची ऑफर दिली.

आणखी पैसे कमविण्यासाठी अविनाशला सोशल मीडियावर पोस्ट लाइक करण्याचे काम देण्यात आले. सुरुवातीला कामे पूर्ण केल्यानंतर अविनाशला चांगले पैसे मिळाले. चांगले पैसे मिळाल्याने अविनाशचा या अनोळखी माणसांवर विश्वास बसला.

Online Scams |  Pune based engineer loses Rs 20 lakh after liking social media posts

फसवणूक करणार्‍याने नंतर आणखी पैसे कमवण्याचे अमिष दिले आणि अविनाशला अधिक कमाई करण्यासाठी पैसे गुंतवणे करण्यासाठी सांगितले. अमिषाला बळी पडून अविनाशने टास्क ग्रुपमध्ये येण्यासाठी 20.32 लाख रुपये दिले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे अविनाशला लक्षात आले.

अविनाशने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून  ३ जानेवारी रोजी वाकड पोलिसांकडे आयपीसीच्या कलम ४०६, ४१९, ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या कलम ६६(सी) आणि (डी) अंतर्गत औपचारिक तक्रार नोंदवली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.