Keshav Upadhye | उद्धव ठाकरेंची अवस्था मतदारांनी वर्ल्ड कपमधील इंग्लंडच्या संघासारखी केलीय; ग्रामपंचायत निकालावर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: काल राज्यातील दोन हजाराहून अधिक ग्रामपंचायतीचा कौल जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालामध्ये भाजप नंबर वन पक्ष ठरला आहे.  याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्द टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule), शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था मतदारांनी वर्ल्ड कपमधील इंग्लंडच्या संघासारखी केली आहे, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, “भाजपद्वेषाने पछाडलेल्यांनो, तुम्ही कितीही खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा. तोंडावर आपटण्याशिवाय दुसरं काही वाट्याला येणार नाही.

सुप्रिया सुळे यांनी मा. देवेंद्र फडणवीस जीच्या राजीनाम्याचा रतीब लावला असताना मतदार मा. देवेंद्रजींच्या पाठिशी ठाम राहिले. शरद पवार मा. मोदीजींवर टीका करण्यात व्यस्त असताना मा. मोदींजीच्या ग्रामविकासाच्या योजनांना ग्रामीण महाराष्ट्र पसंती देताना दिसला.

बारामती सुध्दा गेल नाना पटोले बिनबुडाचे टीका करत राहिले आणि जनतेने जिल्ह्यातही पटोलेंना सपशेल नाकारले. उद्धव ठाकरेची अवस्था तर मतदारांनी आता वर्ल्डकपमधील इंग्लंडच्या संघासारखी केलीय. यापेक्षा तळाला आणखी जाणार तरी किती?”

Times have been hard – Sanjay Raut

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काळ मोठा कठीण आला आहे.

राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत. या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.

जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात.मुंबई सह 14 महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते. ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.