Bank Holidays In July 2023 । जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँक बंद राहतील, पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays In July 2023 | आज जून महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उद्यापासून जुलै महिना सुरू होणार आहे. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलै 2023 च्या बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. (Bank Holidays In July) ही यादी राष्ट्रीय स्तरावरील बँक सुट्ट्यांची आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांनाही बँका बंद असतात. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जुलै महिन्यात विविध राज्यांमध्ये 15 दिवस बँका बंद राहतील.

Check out the list of bank holidays in the month of July

– 2 जुलै 2023: रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
– 5 जुलै 2023: गुरू हरगोविंदजींच्या जयंतीनिमित्त श्रीनगर, जम्मूमध्ये बँका बंद राहतील.
– 6 जुलै 2023: मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये MHIP दिनानिमित्त बँका बंद राहतील.
– 8 जुलै 2023: महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
– 9 जुलै 2023: रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
– 11 जुलै 2023: केर पूजेनिमित्त आगरतळा येथे बँका बंद राहतील.
– 13 जुलै 2023: भानू जयंतीनिमित्त गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
– 16 जुलै 2023: रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
– 17 जुलै 2023: शिलाँगमध्ये यू तिरोट सिंग डे रोजी बँका बंद राहतील.
– 22 जुलै 2023: महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
– 23 जुलै 2023: रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
– 28 जुलै 2023: जम्मू आणि श्रीनगरमध्ये आशुरानिमित्त बँका बंद राहतील.
– 30 जुलै 2023: रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.