Farming Apps | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘हे’ ॲप ठरू शकते माहितीचे भांडार

Farming Apps | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतीसाठी वेगवेगळे ॲप्स (Apps) विकसित होत आहे. या ॲप्सच्या माध्यमातून शेतकरी पिक उत्पादनापासून ते शेतमाल बाजारभावापर्यंत सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतात. अशात बाजारामध्ये नुकतंच एक ॲप आलं आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी घर बसल्या सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकतात. ‘कृषी शेतकरी… आधुनिक शेतकरी’ या ॲपच्या माध्यमातून शेतकरी त्यांना हवी ती माहिती मिळू शकतात. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दूर होणार आहेत.

राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती संयुक्त विद्यमानाने हे ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी हवामान अंदाज, कृषी व पशु सल्ला, शेती विषयक बातम्या, बाजारभाव, कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, पिकांसंबंधी समस्या इत्यादी गोष्टींबाबत माहिती मिळू शकतात. शेती विषयक सर्व उपयुक्त माहिती या ॲपवर उपलब्ध असणार आहे.

शेतकरी पिकांच्या लागवडीसाठी देखील या ॲपची मदत घेऊ शकतात. खरीप, रब्बी, उन्हाळी पिके, भाजीपाला फळपिके याबद्दल देखील शेतकऱ्यांना या ॲपवर सल्ला मिळू शकतो. त्याचबरोबर कुकूटपालन, शेळीपालन, दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन याबाबत देखील शेतकरी या आमच्या माध्यमातून सल्ला घेऊ शकतात.

ॲप कसे डाऊनलोड करायचे? (How to download the app?)

शेतकरी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘कृषिक ॲप’ सर्च करून हे ॲप डाऊनलोड करू शकतात. हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मोबाईल नंबर, नाव, जिल्हा, तालुका, गाव इत्यादी प्रकारची माहिती प्रविष्ट करावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला नियम आणि अटी मान्य करून मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा लागेल. या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावर तुमचे ॲप सुरू होईल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.