Mango Side-effects | आंब्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Mango Side-effects | टीम महाराष्ट्र देशा: आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. बहुतांश लोकांना आंबा खायला आवडतो. आंब्यामध्ये विटामिन ए आणि विटामिन डी यासारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आंब्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, अति प्रमाणात आंब्याचे सेवन केल्याने आरोग्याला काही दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. आंबा आपल्या आरोग्यासाठी जितका फायदेशीर मानला जातो तितकाच तो जास्त प्रमाणात खाल्ल्याने हानिकारक देखील ठरू शकतो. आंब्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला खालील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

वजन वाढते (Weight increases-Mango Side-effects)

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आढळून येतात, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर वजन नियंत्रणात ठेवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मर्यादेमध्ये आंब्याचे सेवन केले पाहिजे. आंब्याचे अति प्रमाणात सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढू शकते.

साखरेची पातळी वाढते (Sugar levels rise-Mango Side-effects)

तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्ही आंब्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर आढळून येते, जी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असेल तर तुम्ही नियंत्रणात आंब्याचे सेवन करावे आणि शुगर टेस्टही नियमित करावी.

त्वचेसाठी हानिकारक (Harmful to skin-Mango Side-effects)

आंब्याचा प्रभाव उष्ण मानला जातो. त्यामुळे आंब्याचे अति प्रमाणात सेवन केल्याने तेलकट त्वचा आणि त्वचेच्या इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. आंब्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. एवढेच नाहीतर आंबा खाल्ल्यानंतर व्यवस्थित तोंड धुतले नाही, तर चेहऱ्यावर मुरूम येण्याची शक्यता वाढते.

आंब्याचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला वरील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला उन्हाळ्यात उन्हामुळे सतत चक्कर येत असेल, तर तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

सुकी कोथिंबीर (Dry coriander-Dizziness)

चक्कर येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सुकी कोथिंबीर फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला रात्री एक ग्लास पाण्यामध्ये आवळ्यासोबत कोथिंबीर भिजवून ठेवावी लागेल. सकाळी उठल्यावर तुम्हाला रिकाम्या पोटी या पाण्याचे गाळून सेवन करावे लागेल. याचे सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होते आणि पोटही व्यवस्थित साफ होते.

आल्याचा चहा (Ginger tea-Dizziness)

आल्याचे सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या सहज दूर होऊ शकते. आल्यामध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात, जे थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये आल्याचा एक तुकडा टाकून ते पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी तुम्हाला गाळून कोमट करून प्यावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या सहज दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.