Seasonal Allergy | मोसमी एलर्जीपासून दूर राहण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे करा सेवन

Seasonal Allergy | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे बहुतांश लोकांना एलर्जीच्या समस्येला सामोरे जावे लागते. खाद्यपदार्थ, पाळीव प्राणी, पक्षी, हवामानातील बदल, सुगंध, वास इत्यादी कारणांमुळे एलर्जी होऊ शकते. एलर्जी झाल्यास पुरळ, खाज, शिंका, सर्दी इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधतात. तुम्ही पण जर या समस्यांपासून त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टींचे सेवन केल्याने तुमची एलर्जीची समस्या सहज दूर होऊ शकते.

लसूण (Garlic-For Seasonal Allergy)

लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटिबायोटिक आणि अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे शरीरातील बॅक्टेरियाचा संसर्ग रोखण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी दोन ते चार लसणाच्या पाकळ्यांचे सेवन केल्याने तुमची एलर्जीची समस्या सहज दूर होऊ शकते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात.

मध (Honey-For Seasonal Allergy)

एलर्जीच्या समस्यांवर मात करण्यासाठी मध उपयुक्त ठरू शकतो. मधामध्ये अँटिबॅक्टरियल, अँटिव्हायरल आणि अँटिस्पेक्टिक गुणधर्म आढळून येतात, जे एलर्जीपासून संरक्षण करू शकतात. यासाठी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी मधाचे सेवन करावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

हळद (Turmeric-For Seasonal Allergy)

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे एलर्जीची समस्या कमी करण्यासाठी हळद मदत करू शकते. यासाठी तुम्हाला मधासोबत हळदीचे सेवन करावे लागेल. त्याचबरोबर तुम्ही दुधामध्ये हळद मिसळून देखील त्याचे सेवन करू शकतात. हळदीचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी एलर्जी आणि मोसमी आजार दोन्हीपासून दूर राहू शकतात.

मोसमी एलर्जीपासुन सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वरील पर्यायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खाली टिप्स फॉलो करू शकतात.

सनस्क्रीनचा वापर करा (Use sunscreen-Summer Skin Care)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन आपल्या त्वचेची सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते. त्याचबरोबर याचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावणे उपयुक्त ठरू शकते.

शरीर हायड्रेट ठेवा (Keep the body hydrated-Summer Skin Care)

या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा शरीर हायड्रेट राहते तेव्हा तुमची त्वचाही हायड्रेट राहते. चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दररोज 8 ते 10 ग्लास पाण्याचे सेवन केले गेले पाहिजे. माफक प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहू शकते.

व्यायाम करा (Do exercise-Summer Skin Care)

उन्हाळ्यात शरीरातील उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्याचबरोबर नियमित व्यायाम केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.